लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
यावर्षीचा रब्बी हंगाम जोरात सुरू असून शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्याची लगबग सुरू आहे परंतु लोणार तालुक्यातील मांडवा येथील शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिली जात होती त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्यासाठी फार कसरत करावी लागत होती तर दुसरीकडे थंडीचे दिवस असल्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांची प्रकृती बिघडत होती व शेतामधील साप विंचू यासह जंगली प्राण्यांपासून सुद्धा शेतकऱ्यांच्या जीवितवास धोका होता त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला दिवसा लाईट मिळावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्याकडे संपर्क साधला सहदेव लाड यांनी क्षणाचाही विलंबना करता सहाय्यक अभियंता बीबी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन शेतकऱ्यांना दिवसा लाईट न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता सहदेव लाड यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मांडवा येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसाची लाईट सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


Post a Comment
0 Comments