Type Here to Get Search Results !

भुमराळा ते किनगाव मार्गावरील आंदोलनाला यश


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जटटू दरम्यानच्या अत्यंत महत्त्वाच्या डांबरी रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत भाजपा जिल्हा अध्यक्ष सोशल मिडिया देवानंद सानप यांनी गणपती बाप्पा ची आरती करुन खड्यांचे पुजन करत आंदोलन केले होते या आंदोलनाने प्रशासन व ठेकेदारांना अक्षरशः खडबडून जागे केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात या अनोख्या आंदोलनाची प्रचंड चर्चा असून, अखेर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी ठेकेदाराने डांबरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरू केले आहे.या मार्गावरील खोल खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अनेक वर्षांपासून रस्ता बिघडत असूनही दुरुस्ती सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी गणपती बाप्पाची आरती करत खड्ड्यांचे ‘पूजन’ करून आंदोलन छेडले. भाजपा जिल्हाध्यक्ष देवानंद सानप यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विभागीय अधिकाऱ्यांना सजग केले होते. त्यांच्या ‘तत्काळ काम सुरू करा, अन्यथा पुढील उग्र आंदोलन’ या इशाऱ्यानंतर अखेर प्रशासन हलले.

गेल्या दोन दिवसांत या आंदोलनाची सोशल मीडियासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी चर्चा झाली. नागरिकांच्या दबावामुळे आणि वृत्तपत्रात आलेल्या ठळक बातमीमुळे ठेकेदार व संबंधित विभागावर तातडीने काम सुरू करण्याचा दबाव निर्माण झाला.

आज सकाळपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .

या संपूर्ण आंदोलनात भाजप कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. “प्रशासन हलते हे सिद्ध झाले; जनआंदोलनाची ताकद पुन्हा एकदा दिसली,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments