Type Here to Get Search Results !

समतेचा सूर्य मावळला पण अनेक पिढ्यांसाठी प्रकाश सोडून गेला - डॉ गोपाल बच्छीरे


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

 ०६ डिसेंबर १९५६ साली जगातील समतेचा सूर्य मावळला परंतु पुढील लाखो पिढ्यांना पुरेल एवढा प्रकाश सोडून गेला असे वक्तव्य डॉ गोपाल बच्छीरे यांनी अभिवादन सभेत केले. 

 लोणार येथील भीमनगर बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्चच्या समारोपानंतर अभिवादन सभेच्या व्याख्यानमालेत डॉ. गोपाल बच्छीरे बोलत होते, ते पुढे म्हणाले गौतम बुद्धाच्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्वता या तत्त्वावर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहून त्यात फक्त दलित, पददलित यांचाच उद्धार केला नाही तर, भारतातील बहुजन अल्पसंख्यांक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्री जातीचा उद्धार केला, स्त्रीला संपत्तीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, समतेचा अधिकार नव्हता, एवढेच काय तर विधवेला जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता आणि तो अधिकार संविधानाच्या माध्यमाने बाबासाहेबांनी स्त्रियांना मिळवून दिला, म्हणून विधवा असतानाही भारताची पंतप्रधान एक स्त्री होऊ शकली आणि हा तळपता समतेचा सूर्य आजच्या दिवशी १९५६ साली मावळला पण येणाऱ्या लाखो पिढ्यांना पुरेल एवढा प्रकाश सोडून गेला या कार्यक्रमात श्री गजानन जाधव, श्री सुदन अंभोरे यांनीही आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे आयोजन तानाजी अंभोरे यांनी केले होते, याप्रसंगी लूकमान कुरेशी, शेख सादिक, योगेश भुक्कन, ओवेस कुरेशी, अशपाक खान, फहीम खान, इक्बाल कुरेशी, उमेश मोरे, अशोक मोरे, डॉ. रंजना बच्छिरे पार्वतीताई सुटे, शालिनीताई मोरे, रोशन अंभोरे, किशोर बच्छिरे, समर्जीत बच्छिरे, अनिल मोरे, अशोक सरदार, आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी अंभोरे यांनी केले तर आभार उमेश मोरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments