सोलापूर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सोलापूर येथे व्हॉइस ऑफ मिडीयातर्फे राज्यस्तरीय केडर कॅम्प भव्य उत्साहात पार पडला. पंढरपूर अधिवेशन यशस्वी करणाऱ्या शूर सरदारांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.
या कॅम्पमध्ये ‘लीड करणारा नेता कसा असावा?’ या विषयावर बोलण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधून पत्रकारांच्या संरक्षणाची गरज, त्यांच्या जगण्यातील संघर्ष आणि समाजाने पत्रकारांना समजून घेण्याची जबाबदारी यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी भूमिकापूर्वक मत मांडले.व व्हॉइस ऑफ मिडीयाने केलेल्या सन्मानाचा मनःपूर्वक स्वीकार केला.पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने काम करणारी व्हॉइस ऑफ मिडीया संघटना खरंच कौतुकास्पद कार्य करीत आहे. हे देखील यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला आयुष्मान भारत समितीचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, ज्येष्ठ पत्रकार रविद्र चिंचोलकर, व्यंकटेश जोशी , व्हॉइस ऑफ मिडीयाचे संस्थापक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments