Type Here to Get Search Results !

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार


बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी तात्काळ आयुष्मान कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे.


🟦 बैठकीत महत्त्वाचे निर्देश

दि. 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लाभार्थ्यांचे १००% आयुष्मान कार्ड तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार दि. 4 डिसेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी व समन्वयकांची तातडीची बैठक घेतली.


💛 आयुष्मान कार्ड का महत्त्वाचे?


अनेक पात्र नागरिकांकडे अजूनही कार्ड नाही. त्यामुळे मोफत उपचारांचा लाभ न मिळण्याची शक्यता!

👉 कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वार्षिक ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात.


🆓 मोफत मिळणाऱ्या सेवा


✔️ वार्षिक ₹5 लाखांपर्यंत उपचार खर्च

✔️ शस्त्रक्रिया, हॉस्पिटलायझेशन, औषधोपचार

✔️ कॅन्सर, हृदयविकार, मोठ्या शस्त्रक्रिया

✔️ जिल्ह्यातील शासन आणि खाजगी मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये सुविधा


📍 आयुष्मान कार्ड कुठे बनवावे?


पात्र नागरिकांनी खालील ठिकाणी जाऊन कार्ड बनवू शकता:

➡️ जवळचे सेवा केंद्र

➡️ सरकारी रुग्णालय

➡️ प्राथमिक आरोग्य केंद्र

➡️ नोंदणीकृत आयुष्मान आरोग्य केंद्र


📄 आवश्यक कागदपत्रे


1️⃣ आधार कार्ड

2️⃣ रेशन कार्ड (असल्यास)


🛡️ आपल्या कुटुंबाचे आरोग्य व आर्थिक संरक्षण सुनिश्चित करा!

आजच आयुष्मान कार्ड काढा! 💙

Post a Comment

0 Comments