मोताळा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने मका व सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत पण आज पर्यंत मोताळा तालुक्यात मका व सोयाबीन नाफेड मार्फत खरेदी चालु नाही शासनाने ठरवुन दिल्या नंतरही नाफेड मार्फत मका व सोयाबीन खरेदी बंद आहे म्हणुन क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मोताळा तहसिलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली की 1/1/26 पर्यंत नाफेड मार्फत खरेदी न केल्यास 2/1/26 ला तहसिलदार मोताळा यांच्या दालनात सोयाबीन व मका फेकुन ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला निवेदन देतेवेळी महेंद्र जाधव, भागवत धोरण,सै ईमरान, गजानन भोपळे, मारोती मेंढे ,सै वसिम, निना घाटे, सागर पुरभे, बंडु देशमुख ,निखील पाटील, गणेश राठोड, राजु शिंदे, प्रविण पाटील, निलेश क्षिरसागर, गजानन गवळी , मुकुंदा शिंबरे, गणेश चव्हाण, सुनिल गोरे,हिदायद खान, विलास जोहरी, सलिम शाह, अमर उगले, योगेश तायडे , एकनाथ मगरे,कादर खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments