Type Here to Get Search Results !

वाहतूक निरीक्षक अतुल सोनावणे यांना सेवेतून निलंबित करा


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात मोठा समजला जाणारा आगार म्हणजे बुलढाणा विभागातील मेहकर आगार.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाल परी तोट्यात असताना सुद्धा मेहकर आगार हा उत्पन्नाच्या बाबतीत पहिल्यापासूनच अग्रेसर असून आज रोजी सुद्धा मेहकर आगाराने उत्पन्नाच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या एकजूटपणामुळे आणि मेहनतीमुळे नाव लौकिक केलेल दिसून येत आहे.

          याच बुलढाणा विभागातील मेहकर आगारामध्ये अनुकंपा च्या माध्यमातून नव्यानेच रुजू झालेले वाहतूक निरीक्षक अतुल सोनावणे यांच्या स्वभावातील हेकेखोर व आरेराविपणाला मेहकर आगारातील कर्मचारी त्रस्त झाले असून एका महिन्यामध्येच अनेक कर्मचाऱ्यांनी तोंडी तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या तर बऱ्याच कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात लेखी तक्रारी सुद्धा वरिष्ठांकडे केल्या असून वाहतूक निरीक्षक अतुल सोनावणे यांना राज्य परिवहन च्या सेवेतून निलंबित आणि बडतर्फ करण्याची मागणी सुद्धा लेखी तक्रारीत कर्मचाऱ्यांनी केलेली आहे.

      चालक नितीन अवसरमोल यांनी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी विभाग नियंत्रकांना सोनावणे यांच्या विरोधात लेखि तक्रार देऊन ते शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याबद्दल सांगितले आहे.तर सर्व बुलढाणा विभागात सेवाजेष्ठतेनुसार अवघ्या सहा नंबर वर वाहतूक नियंत्रक परीक्षा पास असणारे वाहक संजय राठोड यांनी तर वेगवेगळ्या चार तक्रारी आगार व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना देऊन सोनावणे यांच्यावर कडक कार्यवाही करून सोनवणे यांच्या चुकीच्या कामाला आळा घालून मला न्याय द्यावा.अन्यथा आत्मदहनाचा इशाराच त्यांनी वरिष्ठांना दिलेल्या तक्रारीत दिला आहे.तर वाहक सत्यनारायण तेजनकर यांनी सुद्धा आगार व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक यांच्याकडे वेगवेगळ्या पुराव्यानिशी तीन तक्रारी सोनावणे यांचे विरोधात देऊन सोनावणे हे मानसिक तणावात असून त्यांची चांगल्या डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांना रा.प.म. च्या सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी वरिष्ठांकडे लेखी तक्रारीत केली आहे.तसेच वाहक निशांत नवले यांनी सुद्धा विभाग नियंत्रकांना तक्रार अर्जातून सोनावणे हे आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना देवाण-घेवाण करून स्वतःचा खिसा गरम करत असल्याचे सांगितले आहे.अशा तोंडी सुद्धा बऱ्याच तक्रारी त्यांच्या विरोधात मेहकर आगारातील कर्मचारी करत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अनुकंपामधून नव्यानेच रुजू झालेल्या वाहतूक निरीक्षकांना एक तर कर्मचाऱ्यांसोबत चांगल्या वागणुकीचे ट्रेनिंग द्यावे अन्यथा रा.प.म.च्या सेवेतून त्यांना कमी करावे अशी मागणी मेहकर आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने जोर धरून होत आहे.

          नवीन लागलेल्या वाहतूक निरीक्षकांच्या विरोधात एकाच महिन्यात एवढ्या ढीगभर तक्रारी जमा होऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्यामुळे कर्मचारी लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.आता या तक्रारीच्या विरोधात वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण कर्मचाऱ्यांसह इतरही अधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

मी संपूर्ण बुलढाणा विभागामध्ये सेवाजेष्ठतेनुसार सहा क्रमांकावर असून वाहतूक नियंत्रण परीक्षा सुद्धा पास आहे तरी वाहका ऐवजी इतरत्र होणाऱ्या वापरामध्ये फार मोठ्या संख्येने माझ्यापेक्षाही ज्युनिअर कर्मचाऱ्यांचा वापर होत असून नियमानुसार मलाही इतरत्र वापराची संधी द्यावी.असे मी वेळोवेळी लेखी तक्रार अर्जानुसार वरिष्ठांना कळविले असून वाहतूक निरीक्षक अतुल सोनवणे यांच्यासह आगार व्यवस्थापक सुद्धा याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसल्यामुळे मी आत्मदहनाची नोटीस दिलेली आहे. त्यामुळे मला जर न्याय मिळाला नाही तर मी केव्हाही व कुठेही आत्मदहन करेल आणि त्यास सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी राहतील.

संजय राठोड, वाहक मेहकर आगार

मेहकर आगारात नव्यानेच अनुकंपा मधून लागलेले वाहतूक निरीक्षक अतुल सोनवणे हे कर्मचाऱ्यांसोबत अतिशय अरेराविपणा व हुकुमशाही दाखवत आहेत. ते रा.प.म.चे नियम बाजूला डावलून फक्त स्वतःचा खिसा गरम करत असल्यामुळे रा.प.म.चे नुकसान होत आहे.आणि कर्मचारी मानसिक तनावात आहेत.त्यामुळे मी दिलेल्या तक्रारीनुसार सोनावणे हे डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वागत असल्यामुळे त्यांची चांगले डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांना रा.प.म. च्या सेवेतून कमी करावे.

सत्यनारायण तेजनकर ,वाहक मेहकर आगार

Post a Comment

0 Comments