Type Here to Get Search Results !

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठं आंदोलन उभं करावं लागेल - रविकांत तुपकर

 


पुणे, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

पुणे येथे ६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर यांच्या पुढाकाराने “लढवय्या शेतकरी नेत्यांचा सन्मान व चिंतन बैठक” हा भव्य कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या नेत्यांचा सन्मान करण्यात आला तसेच राज्यातील सध्याच्या कृषी परिस्थितीवर सखोल चर्चा झाली.


“लढाई थांबून चालणार नाही, ती आणखी मोठी आणि व्यापक करावी लागेल. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठं आंदोलन उभं करावं लागेल, कारण आता संघर्षाशिवाय हक्क मिळणार नाही." हे ठाम मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.

या बैठकीला माजी आमदार बच्चू कडू, विठ्ठलराजे पवार, नितेश कराळे तसेच राज्यभरातील अनेक शेतकरी नेते आणि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments