Type Here to Get Search Results !

डॉ.निवृत्ती जाधव राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

 


मलकापूर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मलकापूर येथे राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने महाराष्ट्रातील सामाजिक,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,कृषी , उद्योग ,वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता, महिला बालविकास, कला, साहित्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.निवृत्ती जाधव यांना राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष धनश्री काटेकर ह्या होत्या तर अनेक समाजसेवक,डॉक्टर प्राध्यापक ,वकील ,इंजिनियर सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या विविध समाजसेवकाचे हसते व दैनिक कर्णधार परिवाराच्या व डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया या सर्वांच्या वतीने डॉक्टर निवृत्ती जाधव यांना राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. निवृत्ती जाधव यांना यापूर्वी सामाजिक न्याय विभागाचा शाहू, फुले ,आंबेडकर पुरस्कार देऊन मुख्यमंत्री यांनी सन्मानित केलेले आहे.तसेच 1 मे 2025 रोजी जिल्हा युवा पुरस्कार देऊन जिल्ह्याचे पालक मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सुद्धा सन्मानित केलेले आहे. अन्य इतर 40 पुरस्काराने आतापर्यंत डॉ.निवृत्ती जाधव यांना सन्मानित आहे.

Post a Comment

0 Comments