Type Here to Get Search Results !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे ७ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शाळा प्रवेश दिनानिमित्त मुळचे शेलगाव देशमुख येथील रहिवासी व सध्या मेहकर येथे स्थायिक झालेले नथ्थु लक्ष्मण खंडारे व देवराव लक्ष्मण खंडारे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन,चॉकलेट व बिस्कीट सह शालेय साहित्याचे वाटप केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक भाकडे यांनी केले तर शिक्षिका कुकडे, अंगणवाडी सेविका दळवी व श्रीमती काकडे आदी उपस्थितीत होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ७ नोव्हेबर १९०० मध्ये प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथील शाळेत प्रवेश दिनाला १२५ वर्ष पूर्ण झाले आहेत. तर बंकिमचंद्र (चटर्जी) चटोपाध्याय यांनी रचलेल्या वंदेमातरम् राष्ट्रगानाला १५० वर्ष झाले आहे या दोन्ही विषयावर सेवानिवृत्त शिक्षक नथ्थु खंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आईचा सहावा स्मृतीदिन बालपणी च्या शाळेत साजरा केला.

Post a Comment

0 Comments