Type Here to Get Search Results !

अखंड चातुर्मास सांगता सोहळा निमित्त ह.भ.प ज्ञानेश्वरी काळबांडे यांचे हरिकिर्तन


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील मारोती संस्थान येथे अध्यक्ष माधवराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली २९ आक्टोबर पासून अखंड चातुर्मास सांगता सोहळ्यास सुरवात करण्यात आली आहे.४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता काशिनाथ श्रीराम भातखोडे यांच्या सौजन्याने ह.भ.प. ज्ञानेश्वरी काळबांडे वाशीम यांचे हरिकीर्तन संपन्न झाले.

गायनाचार्य म्हणून ह.भ.प. ज्ञानेश्वर आखरे, किसन आखरे, संजय पोफळे, रामेश्वर आखरे, उद्धव पान्नासे ,राजू ताबस्कर, महादेव आल्हाट, ज्ञानबा तोतरे, दत्ता खराट, केशव सोनुने, ज्ञानेश्वर सर्जेराव, मिटू शिंदे ,तात्याराव गरड, संजय गायकवाड, प्रकाश शिंदे, अशोक आखरे, केशव ताकतोडे, शिवानंद सपकाळ संतोष भुसारी, विनोद ताकतोडे, भाऊराव वानखेडे.मृदंगाचार्य म्हणून ह.भ.प. दशरथ काळदाते, विठ्ठल कष्टे, सत्यनारायण कष्टे रामचंद्र आखरे, हिम्मत लोढे, कैलास चव्हाण, कृष्णा सातपुते, तुषार ठोकळ,धार्मिक विधी धनंजय जोशी, हेमंत जोशी, विणेकरी प्रकाश आखरे, बंडू ताकतोडे, लक्ष्मण आखरे सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments