Type Here to Get Search Results !

दिव्यांगाच्या मानधनात वाढ, कागदपत्रासह तहसील कार्यालय संपर्क करावा -नायब तहसीलदार विवेक नालट


 मेहकर, लोकतंत्र न्यूज 

संजय गांधी निराधार योजनेतंर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना शासन निर्णय दिनांक 15 सप्टेंबर 2025 नुसार 1500 वरुन 2500 रुपये लाभ मंजुर करण्यात आला आहे.


त्यानुसार तहसिल कार्यालय मेहकर (संगायो विभाग) यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, संजय गांधी निराधार योजने अतंर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य माहे ऑक्टोंबर -2025 पासुन 1500 वरुन 2500 रुपये अनुदान करण्यात आले आहे. तेव्हा मेहकर तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी 3215 दिव्यांगाना यांना सदर शासन निर्णय नुसार लाभ दयावयाचा आहे.


मेहकर तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी यांना शासनाकडुन डि बी टी व्दारे माहे ऑक्टोंबर 2025 या महिण्याचे अनुदान 1500 रुपये मिळाले असेल, त्या लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार विभाग तहसिल कार्यालय मेहकर येथे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्डची ई प्रत, UDID कार्ड, व बँक पासबुक (सर्व कागदपत्राची Colours (रंगीत) छायांकीत प्रती) सादर करण्याचे आव्हान विवेक नालट, नायब तहसिलदार मेहकर संगांयो विभाग यांनी केले आहे.


तसेच मेहकर तालुक्यातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी विधवा, परितक्ता, घटस्फोटीत व दुर्धर आजार लाभार्थी यांचे डी बी पोर्टलवर आधार अपडेट करणे बाकी असलेले एकुण 822 लाभार्थी यांना आधार कार्ड व बॅकपासबुक, तसेच आधारला लिंक असलेले मोबाईल घेउन वृत्तपत्रातील प्रसिध्दी पासुन 15 दिवसाच्या आत तहसिल कार्यालय मेहकर येथे उपस्थित रहाणेबाबत याव्दारे आव्हान करण्यात येत आहे.


डी बी टी पोर्टलवर बाकी असलेले एकूण 822 लाभार्थी हे 15 दिवसाच्या आत उपस्थित न झाल्यास सदर लाभार्थी डी बी टी पोर्टलवरुन कमी करण्यात येईल तरी सर्व पोर्टलवरील डी बी टी न झालेले लाभार्थी यांनी याबाबत नोंद घ्यावी.असे आवाहन नायब तहसीलदार विवेक नालट यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments