Type Here to Get Search Results !

शेलगाव देशमुख येथे अखंड चातुर्मास सांगता सोहळा


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील मारोती संस्थान येथे अध्यक्ष माधवराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली २९ आक्टोबर पासून अखंड चातुर्मास सांगता सोहळ्यास सुरवात करण्यात आली असून सकाळी काकडा आरती, सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिकीर्तन कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत.यामध्ये रामेश्वर आखरे,प्रकाश शिंदे, तातेराव गरड, परशराम पोफळे, सरपंच किरण दिलीप आखरे,माजी सरपंच सुनीता विनोद ताकतोडे, काशिनाथ श्रीराम भातखोडे,आयजी ग्यानबा नागरिक यांच्या सौजन्याने ह.भ.प.विठ्ठल महाराज काटे,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज आखरे,ह.भ.प. प्रवीण महाराज काळे,ह.भ.प. गणेश महाराज वाझुळकर,ह.भ.प. कु.नंदिनी सावंत छ. संभाजीनगर,ह.भ.प. रत्नमाला गोरे आळंदी,ह.भ.प. ज्ञानेश्वरी काळबांडे वाशीम,ह.भ.प. नारायण महाराज गरड यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आला आहे.

गायनाचार्य म्हणून ह.भ.प. ज्ञानेश्वर आखरे, किसन आखरे, संजय पोफळे, रामेश्वर आखरे, उद्धव पान्नासे ,राजू ताबस्कर, महादेव आल्हाट, ज्ञानबा तोतरे, दत्ता खराट, केशव सोनुने, ज्ञानेश्वर सर्जेराव, मिटू शिंदे ,तात्याराव गरड, संजय गायकवाड, प्रकाश शिंदे, अशोक आखरे, केशव ताकतोडे, शिवानंद सपकाळ संतोष भुसारी, विनोद ताकतोडे, भाऊराव वानखेडे.मृदंगाचार्य म्हणून ह.भ.प. दशरथ काळदाते, विठ्ठल कष्टे, सत्यनारायण कष्टे रामचंद्र आखरे, हिम्मत लोढे, कैलास चव्हाण, कृष्णा सातपुते, तुषार ठोकळ,भजनी मंडळ होळकर भजनी मंडळ, होळकर महिला भजनी मंडळ, दत्त भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ, कऱ्हाळवाडी, कनका, विठ्ठलवाडी, पांगरखेड, गोहगाव, आंचळ कुकसा, जोगेश्वरी, कारंजी गरड, आंधूड, महागाव, परतापूर.धार्मिक विधी धनंजय जोशी, हेमंत जोशी, विणेकरी प्रकाश आखरे, बंडू ताकतोडे, लक्ष्मण आखरे हे असणार आहेत.५ नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments