Type Here to Get Search Results !

निकृष्ट दर्जाचे राशन गरिबांना वाटण्यात येऊ नये - दिलीप गायकवाड


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील राशन दुकान मध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेने सदर बाबीची दखल घेत मेहकर तहसील कार्यालय येथे १७ नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांना दिले.

मेहकर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने पडलेल्या दुष्काळ परिस्थितीमुळे गरिबांची परिस्थिती हलाखीची झालेली आहे. आणि गरिबांच्या हाताला रोजगार नसल्यामुळे गरिबांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. असे असताना शासन गरिबांना मोफत राशन देत आहे परंतु गरिबांना देण्यात येणार रेशन दुकान मधील धान्य हे निकृष्ट दर्जाचे आणि गरिबांच्या आरोग्यासी हानिकारक आहे. सदर बाबीकडे लक्ष देऊन संघटना प्रमुख दिलीप गायकवाड, संघटनेचे पदाधिकारी गजानन मेटांगळे, दिनकर मैंद, रज्जाक शहा, नंदकिशोर साखरकर, विठ्ठल गायकवाड, पिंटू फुके इत्यादी पदाधिकारी तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार यांना सदर बाबीची नोंद घेण्यास भाग पाडून निकृष्ट दर्जाचे राशन गरिबांना वाटण्यात येऊ नये आणि यापुढे जर निकृष्ट दर्जाचे राशन गरिबांना दिल्या गेले तर संघटना आक्रमक आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला.

Post a Comment

0 Comments