Type Here to Get Search Results !

लोणार नगरपरिषदेवर ठाकरेसेनेचा भगवा फडकणार-आमदार सिद्धार्थ खरात

 


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

लोणार नगर परिषदेवर ठाकरेसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार शहराच्या मतदारांना करून सत्ता ठाकरेसेनेचीच येणार असा विश्वास व्यक्त केला.

लोणार नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सोबत लढावे व नगराध्यक्षाची जागा ठाकरेसेनेस सोडण्यात यावी करिता काँग्रेस सोबत सर्वतोपरी चर्चा करण्यात आली परंतु यातून काही फलित न निघाल्याने शेवटी लोणार मध्ये ठाकरेसेना स्वबळावर लढून शिवसेना उबाठा ची नगराध्यक्ष पदाची उमेदवार डॉ. रंजना गोपाल बछिरे यांचा उमेदवारी अर्ज व १० प्रभागात २० नगरसेवकांचे नामांकन भरून ए.बी. फॉर्म सोबत लावण्यात आले. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, लोणार शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करून दररोज नळाला पाणी देऊत, सांडपाण्याची समस्या, स्वच्छतेची समस्या, विजेची समस्या सोडविण्यासाठी व नगर परिषदेच्या शाळेचे आधुनिकीकरण करून चांगले शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना मिळवून द्यायचे आहे यासाठी लागणारा वाटेल तेवढा निधी मी शासनाकडून आणून देईल परंतु त्याकरिता येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत, उच्चशिक्षित व लोणारच्या सर्व समस्यांची जाण असलेल्या आंदोलक डॉ.गोपाल बछिरे याच्या सुविध्य पत्नी व ठाकरे सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. रंजना गोपाल बछिरे व विस चे वीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार शहराच्या सुजाण मतदारांना केले आहे, याप्रसंगी ठाकरेसेनेचे जिल्हा संघटक डॉ.गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख राजू बुधवत, शहरप्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे यांच्यासह सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments