मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख येथे २० नोव्हेंबर रोजी डोणगाव येथील शाखेच्या वतीने नाबार्ड व दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन मारोती मंदिर सस्थांनचे अध्यक्ष माधवराव डोळस, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचपती दिलीपराव आखरे, उपसरपंच विनोद गोरे प्रमुख वक्ते म्हणून प्रतिष्ठित नागरिक संतोषराव मेटांगळे, विनोद ताकतोडे,रसूल भाई, इंद्रजित देशमुख, देविदास झोपाटे, इरफान शहा, आयुब खा,तोफीक भाई व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
डोणगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक बालाजी वानखेडे यांनी जिल्हा बँकेत सुरू असलेल्या सेवांची माहिती तसेच आर्थिक व डिजिटल व्यवहार कसे करावे व व्यवहार करतांना काय खबरदारी घ्यावी ,जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही या बाबत मार्गदर्शन केले.गट सचिव संजय धोटे यांनी बँक राबवित असलेल्या ठेवी विषयी, QR कोड RTGSO, ATM, ईल. बील विविध प्रकारचे कर्ज वाटप इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विष्णु आखरे पाटील यांनी करून बँके विषयी माहीती दिली आणि जास्तीत जास्त खाते काढून आपल्या ठेवी आपल्या बँके मध्ये ठेवाव्या असे आवाहन केले.
कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन गटसचिव संजय धोटे यांनी केले सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते हमीद सावकार, विकास ताकतोडे, पोलिस पाटील संतोष सोनूने, तंटामुक्ती माजी अध्यक्ष प्रल्हाद गोरे, पत्रकार संतोष राऊत, नारायण खोडवे,शेख नबीब, शाखेचे रोखपाल पवार ,गटसचिव अवसरमोल, गजानन खोडवे शेख कादर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments