आगामी पंचायत समिती निवडणुकीत पांग्री उगले (ता. सिंदखेडराजा) येथील विकास श्रीराम उगले यांनी उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विकास उगले हे शेतकरी कुटुंबात जन्मलेले असून लहानपणापासूनच शेतकरी चळवळीसोबत सक्रियपणे जोडलेले आहेत. आदरणीय शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या संघर्षमय चळवळीमधून त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे.
“मी स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी आणि आवश्यकता मला मनापासून समजतात. आजवर जसे त्यांच्या हक्कांसाठी लढलो, तसेच पुढेही त्यांच्या वेदना प्रामाणिकपणे राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करत राहीन. फक्त एक संधी द्या… मी माझे शब्द कृतीतून सिद्ध करीन,” असे त्यांनी नमूद केले.
गावाच्या विकासाबाबत त्यांनी पुढील कामकाजाचे चार प्रमुख आधारस्तंभ जाहीर केले —मूलभूत सुविधा, विकासात्मक प्रकल्प, पारदर्शक प्रशासन आणि लोकसंपर्कावर आधारित कार्यशैली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, गावाच्या सर्वांगीण विकासासाठीची सविस्तर कार्ययोजना लवकरच सार्वजनिक केली जाईल.
“आदरणीय रविकांत तुपकर यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी मी सतत कार्यरत राहील,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
— विकास श्रीराम उगले
पांग्री उगले, ता. सिंदखेडराजा
क्रांतिकारी शेतकरी संघटना
तालुका अध्यक्ष सिंदखेड राजा

Post a Comment
0 Comments