Type Here to Get Search Results !

संविधान सन्मान महासभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे - मिलिंद वानखडे


बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

भारतीय नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत अधिकार बहाल करणाऱ्या संविधानाच्या सन्मानार्थ संविधान दिनाच्या पार्श्वभूमिवर भारताचे संविधान हाच आमचा अभिमान हे ब्रीदवाक्य घेऊन व जाती समूहाला एकत्रीत करून छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर मुंबई येथे २५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे.

       वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे संविधान सन्मान सभेला संबोधित करणार आहेत. तसेच या ऐतिहासिक सभेसाठी संपूर्ण देशभरातील मान्यवरांची उपस्तिथी राहणार आहे. ऐतिहासिक होणाऱ्या सभेचे आपण सुद्धा साक्षीदार व्हावे या करिता प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने बुलढाणा शहरातील समस्त बहुजनवादी, लोकशाहीवादी तसेच संविधानावर प्रेम करणारे सर्व जातीसमूहातील मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments