Type Here to Get Search Results !

शेतकरी–शास्त्रज्ञ मंचाची 34 वी सभा संपन्न; ऊस लागवड व व्यवस्थापनावर मार्गदर्शन

 


बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

बुलढाणा दि. 26 : कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने मौजे सातगाव म्हसला येथे शेतकरी–शास्त्रज्ञ मंचाची 34 वी सभा उत्साहात पार पडली. राजूभाऊ उर्फ अवचीतराव पालकर यांच्या शेतात झालेल्या या सभेत ऊस लागवड व व्यवस्थापनाविषयी कृषी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.


🌱 मुख्य उपस्थिती:

अनिल गुंजाळ (अध्यक्ष, पैनगंगा साखर कारखाना), श्री. म्हस्के (व्यवस्थापकीय संचालक), डॉ. अमोल झापे (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख), डॉ. भारती तिजारे, प्रवीण देशपांडे, डॉ. जगदीश वाडकर, मनेश यदुलवार, डॉ. दिनेश कानवडे, डॉ. आशुतोष लाटकर, मनोजकुमार ढगे तसेच शेतकरी–शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष विजय भुतेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित.


🌾 सभेतील प्रमुख मुद्दे:

• ऊस लागवड ही फायदेशीर शेती – राजूभाऊ पालकर

• ऊस लागवडीचे तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन व ओलित पद्धती – डॉ. भारती तिजारे

• प्रमुख किडींची ओळख व नियंत्रण – प्रवीण देशपांडे

• रोपवाटिकेचे महत्त्व व सुधारित लागवड पद्धती – डॉ. आशुतोष लाटकर

• ऊस क्षेत्रवाढ व शेती संलग्न व्यवसायाचे महत्त्व – अनिल गुंजाळ

• कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती – मनोजकुमार ढगे


👨‍🌾 सभेनंतर शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात फलदायी चर्चासत्र झाले तसेच उपस्थितांनी ऊस प्रक्षेत्राचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.


🙏 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मनेश यदुलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजूभाऊ पालकर व सातगाव म्हसला ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments