Type Here to Get Search Results !

भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती जनजाती गौरव दिवस


डोणगाव, लोकतंत्र न्यूज नेटवर्क

मदन वामन पातुरकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, डोणगाव.येथे १५ नोव्हेंबर रोजी महान क्रांतिकारी, स्वातंत्र्यसेनानी, क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती पंधरवाडा अंतर्गत विविध उपक्रमांनी प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. 

‘जल, जंगल, जमीन’ या आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी लढा देणाऱ्या या अमर वीराला शाळेत अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी कु. प्रांजली अंभोरे वर्ग 10 (ब )ची विद्यार्थिनी होती. यावेळी मंचावर प्राचार्य रमेश जाधव, पर्यवेक्षक अरुण मुगल, प्रमुख वक्ता कु.कोमल भोकरे,संजय गवई ,संजय गव्हले,प्राध्यापक सुर्वे, प्राध्यापिका पाटील, दत्तात्रय उंडाळ व अक्षय कुटे हे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ता म्हणून कु . कोमल भोकरे या विद्यार्थिनीने भूमिका पार पाडली. जयंतीनिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण इतिहास सांगून विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले तसा सविस्तर आढावा तिने यावेळी दिला. “उलगुलान” या त्यांच्या आंदोलनाचा इतिहास, ब्रिटिश विरोधातील संघर्ष, आदिवासींच्या हक्कांसाठी केलेली चळवळ आणि समाजजागृतीसाठी केलेले प्रयत्न यांची माहिती कु.भोकरे हिने दिली.वर्ग 5 ते 12 च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बिरसा मुंडा यांच्या कार्यावर आधारित, भाषण घोषवाक्य प्रस्तुती अशा विविध उपक्रमांची मनमोहक सादरीकरणे केली. ‘धरती आबा बिरसा’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.शालेय प्रांगणात “आदिवासी संस्कृती आपली शान” आणि “बिरसा मुंडा – निसर्गाचे रक्षक” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.प्राचार्य रमेश जाधव यांनी पर्यावरण संवर्धन, निसर्गप्रेम, समानता भावना आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

 प्राचार्य यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की,“बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजापुरते सीमित नसून ते समस्त भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे संघर्षमय जीवन आपल्याला न्यायासाठी लढण्याची, निसर्गाचे रक्षण करण्याची आणि समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देते. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात कु. प्रांजली अंभोरे हिने आदिवासी संस्कृती,परंपरा यांची सखोल माहिती दिली.जनजाती गौरव पंधरवडा अंतर्गत दिनांक 11 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यामध्ये शिक्षण आणि कौशल्यविकास यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक ज्ञान , संवाद कौशल्य, स्वावलंबन यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृतीची सखोल अशी माहिती देऊन निश्चित त्यांनी प्रगतीकडे आणखी जोमाने वाटचाल करावी असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले .या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अक्षय कुटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी वानखेडे वर्ग 7 वा हिने केले. तर आभार प्रदर्शन कु. समृद्धी गवई वर्ग 7 वा हिने केले.या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments