मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांना आमदार सिद्धार्थ खरात यांनी मोठा धक्का दिला आहे. शिंदे सेनेत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या शांत संयमी भूमिकेमुळे मेहकर लोणार मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक झाले आहेत. त्या मुळे देऊळगाव साकर्शा येथील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्या मुळे शिंदे सेनेला मोठा फटका बसला आहे.
देऊळगाव साकर्शा येथील शिंदे सेनेचे कार्यकर्ते नरेश साठे, अनिल नामदेव डोलारे ,गणेश आमले,विनोद हिम्मत मोरे, बबन संपत जाधव,गोपाल श्रीराम गव्हाळे,द्यानेश्वर लक्ष्मण आल्हाट, जीवन वसुदेव इंगळे, उमेश वसुदेव समुद्रवार, शिवा प्रल्हाद नेमाडे, गुलाब शेख यांच्यासह हजारो शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला आहे.
या वेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले व आगामी निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले. या वेळी तालुका प्रमुख निंबाजी पांडव,युवा तालुका प्रमुख ॲड.आकाश घोडे,मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे, देऊळगाव साकर्शा येथील सर्कल प्रमुख पंडित देशमुख, विठ्ठलवाडीचे सरपंच धनराज राठोड, वरवंडचे उप सरपंच तथा विभाग प्रमुख गजानन राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments