मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २ मध्ये सध्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश उर्फ ( मुन्ना )काळे व त्यांची धर्मपत्नी सौ. चंद्रभागा निलेश काळे यांची नगरसेवक निवडून उमेदारी खुप चर्चेचा विषय ठरला आहे.
पत्रकार निलेश काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारण, चळवळ आणि पत्रकारिता या तिन्ही क्षेत्रांत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व आहे. कळत्या वयापासून त्यांनी बहुजन समाजाच्या हक्कांसाठी, गोरगरीब आणि अन्यायग्रस्तांसाठी संघर्ष करत समाजहिताची बाजू नेहमीच उचलली आहे. पत्रकारितेतून त्यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट केला असून, लेखणीच्या माध्यमातून असंख्य पीडितांना न्याय मिळवून दिला आहे.आता हाच सामाजिक व लोकाभिमुख अनुभव नगरसेवकपदाच्या माध्यमातून जनसेवेत आणण्यासाठी निलेश (मुन्ना) काळे आणि सौ. चंद्रभागाताई काळे यांनी येणाऱ्या मेहकर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १-२ मधून उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानंतर प्रभागात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.लोकांच्या आग्रहास्तव सौ. चंद्रभागा काळे यांचा प्रचार प्रारंभ झाला असून, नागरिकांनी त्यांना प्रचंड समर्थन दर्शवले आहे. अद्याप कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार याबाबत निर्णय झालेला नसला तरी, निलेश काळे यांनी सांगितले की, जर तिकीट मिळाले नाही तरीही जनतेच्या आशीर्वादाने आम्ही अपक्ष म्हणून निवडून रिंगणात उतरण्यास तयार आहोत.प्रभाग क्रमांक १ आणि २ मध्ये या पत्रकार दांपत्याच्या उमेदवारीमुळे नव्या उत्साहाचे आणि परिवर्तनाच्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment
0 Comments