Type Here to Get Search Results !

दिव्यांगांना २ हजार ५०० रुपये पेन्शन देण्यासाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन


नांदुरा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

दिव्यांग पेंशन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला ₹२५०० पेंशन मिळणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते.मात्र प्रत्यक्षात काही लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पूर्ण रक्कम ₹२५०० जमा झाली, तर काहींना केवळ ₹१५०० मिळाली आहे.या गोंधळामुळे दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक जणांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सणासुदीच्या काळात ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरली आहे.या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नांदुरा तर्फे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भागवत उगले मनसे तालुकाध्यक्ष,सागर जगदाळे मनसे शहर अध्यक्ष,निकेतन वाघमारे शहर उपप्रमुख,आणि अमोल करूटले इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments