लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बिरसा क्रांती दलाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष भगवानराव कोकाटे यांची अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
निवडीची घोषणा बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी आणि राज्य उपाध्यक्ष डी.बी. अंबुरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहून आदिवासी समाजाच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या भगवानराव कोकाटे यांच्या नेतृत्वगुणांचा विचार करून ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments