मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित डोणगाव येथील इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांमध्ये जिल्ह्यातून अव्वल येत शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये 14 वर्षाखालील वयोगटात हर्डल्स मध्ये प्रणाली पळसकर प्रथम, चैताली पळसकर लॉंग जम्प मध्ये द्वितीय, श्रीपाद सुर्वे हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक. 19 वर्षाखालील वयोगटात अक्षरा भुसारे ट्रिपल जम्प मध्ये द्वितीय. मुलांच्या 14 वर्षांखालील वयोगटात अंशुमन गावंडे लॉन्ग जम्पमध्ये तृतीय क्रमांक, मुलींच्या सतरा वर्षाखालील वयोगटात साक्षी मोरे हर्डल्स मध्ये तृतीय क्रमांक. दिनांक 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर रोजी. बुलढाणा येथे जिल्हास्तरीय मैदानी खेळांच्या स्पर्धा पार पडल्या.
महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेल्या,शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखत दिनांक 7 व 8 आँक्टोबर रोजी क्रिडा संकुल बुलढाणा येथे जिल्हास्तरीय मैदानी खेळांची स्पर्धा संपन्न झाली.
बुलढाणा अर्बन को-आँप क्रेडिट सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल झंवर, बुलढाणा अर्बन को-आँप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, शाळेचे मुख्याध्यापक सुनील गाढे , क्रीडा विभाग प्रमुख नारायण खोडके, क्रिडा मार्गदर्शक अतिवीर सातपुते, विनय खोडके, उल्का सिरसाट पालक व शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments