मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित मदन वामन पातुरकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ,डोणगाव. येथे आज दिनांक 16 ऑक्टोबर गुरूवारला प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दीपोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक गोपाल बोरा उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये स्थानिक सल्लागार सुनील बियाणी, राजकुमार सारडा, बबनराव गोरे, शालिग्राम अवचार उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक प्रा. मुगल, परीक्षा विभाग प्रमुख प्रा .गव्हले ,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा .सरकटे,प्रा. टेकाळे,शे.चिं गवई , प्रा. सुर्वे, दत्तात्रय उंडाळ, प्राध्यापिका मापारी उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती व भारत माता यांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले .प्रमुख वक्ता म्हणुन लाभलेल्या प्राध्यापिका मापारी यांनी दीपावली सणाची सविस्तर माहिती सांगितली व आपण हा आपला सर्वात मोठा उत्सव का साजरा करतो याचे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की दीपावली सणामध्ये आपण पर्यावरणाचे प्रदूषण न करता हा सण साजरा केला पाहिजेत असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये संचालक गोपाल बोरा यांनी आपल्या सर्वांच्या जीवनातील अंधार दूर होऊन प्रकाशाकडे आपला प्रवास व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यासाकडेच लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्राचार्य रमेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून दीपोत्सवाच्या याप्रसंगी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. प्रसंगी शाळेतील प्रत्येक वर्गखोलीची सजावट करण्यात आली .प्रत्येक वर्गाला तोरण बांधून आकाश दिवा लावण्यात आला. प्रत्येक वर्गासमोर रांगोळी काढण्यात आली .तसेच सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन दीपोत्सव अतिशय आनंदात साजरा केला. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे आकाश दिवे तयार करून आणले व एकत्रित येऊन हा दीपोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 10 ची विद्यार्थिनी वैष्णवी पिंपरकर हिने केले. तर आभार प्रदर्शन वर्ग 10 चा विद्यार्थी संस्कार वाळूकर याने केले. सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू- भगिनी या सर्वांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात दीपोत्सव कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments