लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
आज दिनांक 16 ऑक्टोंबर 2025 रोज गुरुवारी सकाळी 11 वाजता हॉटेल अथर्व येथे लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अश्रुजी फुके यांनी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शांतीलालजी गुगलीया, तेथे तर प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस सेवादलचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश धुमाळ, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती केशवराव फुके, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, माजी नगराध्यक्ष बादशाह खान, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, प्रदीप शेठ संचेती, उपस्थित होते यावेळी लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस राजेश मापारी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देत राजेश मापारी यांनी सांगितले की पक्षाने मला प्रेम दिला पंधरा वर्षे तालुकाध्यक्षपद दिला जिल्हा परिषद मध्ये संधी दिली तसेच रंजना राजेश मापारी यांना नगराध्यक्ष पद दिले माझ्या मुलाला युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून संधी दिली या संधीचा फायदा येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती नगर नगरपरिषद व ग्रामपंचायत वर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू अशी गवई दिली
यावेळी माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे,माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब,माजी नगरसेवक संतोष मापारी, माजी नगरसेवक शेख राऊफ शेख महेबुब, माजी नगरसेवक अंबादास इंगळे, माजी नगरसेवक बळीराम मदनकर, दौलत मानकर,माजी नगरसेवक सतीश राठोड, भरत राठोड, गजानन मापारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास मोरे,माजिद कुरेशी, अनिल पाटोळे,एजाज खान, रहमान नवरंगवादी, शुभम चाटे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन महाराज यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेख अहमद यांनी मानले काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments