Type Here to Get Search Results !

नवीन नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळावा - रमेश पाटील


नांदुरा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो.युवक या देशाचा कणा आहे.आणि दररोज कोणी ना कोणी व्यक्ती वयाचे १८ वर्ष पूर्ण करतो व दररोज काही नवीन मतदार निर्माण होतात.या सर्वांना भारतीय राज्य घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे व भारतीय निवडणूक आयोगा कडून सुद्धा मतदानाचा हक्क बजाविण्या बाबत वारंवार जन जागृती करण्यात येते.परंतु महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लाखो नवीन युवक व युवतींनी नवीन मतदान कार्ड साठी अर्ज केले आहेत.करिता निवडणूक आयोगाने नवीन मतदान कार्ड मिळविलेल्या लाखो युवक - युवतींचा या निवडणुकीत मतदार यादीत समावेश करून त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून द्यावा.जो की भारतीय राज्य घटेनेने त्यांना दिला आहे.

लाखो नवीन मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सुक आहे. यांचा मतदार यादीत समावेश करा.कारण राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ही अंतिम यादी म्हणून घोषित करण्यात आली आहे.परंतु तेव्हा पासून ते आजपर्यंत म्हणजे प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम जाहीर होई पर्यंत जवळपास ६ महिने उलटून जातील आणि या ६ महिन्यात लाखो नवीन मतदार बनले जे की मतदार यादीत त्यांचे नाव नाही.परंतु ते मतदानापासून वंचित राहतील.असे होऊ नये करिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला नांदुरा तहसील कार्यालय मार्फत मागणी करण्यात आली आहे.यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील,जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे,रुपेश पवार,अभिषेक सोळंके,दीपक कव्हळे,प्रशंतकुमार पेठकर,सागर डामरे,प्रतीक पोहोकार,प्रशांत भोजने व इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments