अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
October 05, 2025
0
बुलढाणा जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी अवैध वाळूविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासनाला सक्त कारवाईचे आदेश दिले आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशावरून वाळू वाहतूक प्रकरणी कारवाईसाठी गुन्हे शाखेला आदेशित करण्यात आले होते. दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी रात्री अंचरवाडी शिवारात एका टिप्परमध्ये अवैध वाळूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता पिवळ्या रंगाचे एक टिप्पर उभे दिसले. यामध्ये, अंदाजे दोन ब्रास वाळू (किंमत, २० हजार) आढळून आली. चालकाला परवाना बाबत विचारणा केली असता, विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून टिप्पर जप्त करून चालक आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, कॉन्स्टेबल निलेश राजपूत, चालक समाधान टेकाळे यांनी केल्याची माहिती ६ आक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Post a Comment
0 Comments