Type Here to Get Search Results !

ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या

 


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यासह शेलगाव देशमुख महसूल मंडळात २५,२६ जुन व २३,२४ जुलै रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस व सततच्या पावसाने पिकांसह शेती खरडून गेली व सखल भागात पाणी साचून सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सतत पाऊस झाल्याने शेतमजूरांना काम मिळाले नाही.

यामुळे शेतकऱ्यासह शेतमजुराची आर्थिक परिस्थिती खूप बिघडली असून शेलगाव देशमुख महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत, संपूर्ण कर्जमाफी, खरीप हंगाम २०२५ चा पिक विमा व शेतमजुरांना प्रति मजूर ३० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी.या मागणीचे निवेदन ६ आक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मेहकर तहसीलदार निलेश मडके यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार सिद्धार्थ खरात यांचे स्वीय सहाय्यक ॲड.संदिप गवई,माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांना देण्यात आले.

 


यावेळी सरपंच पती दिलीप आखरे,माजी सरपंच भानुदास अजगर , उपसरपंच भागवत डाखोरे,माजी सरपंच भाऊराव जावळे,पियुष केळे, पुरुषोत्तम लोखंडे,बबन खंडारे, प्रविण ठोकळ,गजानन म्हस्के,गफ्फार शहा, परमेश्वर वच्छे, संतोष कऱ्हाळे, भिकाजी हरमकर,आदिल शहा, शिवप्रसाद खराट, वसंता मानकर, बाबुराव कुसळकर, विष्णु आखरे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments