लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात अतिवृष्टी मुळे ओला दुष्काळ जाहीर करून, शेतक-यांची कर्जमाफी व शेतक-यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत तत्काळ देण्यात यावी अशी मागणी लोणार तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष आश्रुजी फुके व शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात 3 आक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन खरात ,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, प्रदीप संचेती, पंचायत समिती माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे, ज्येष्ठ नेते दौलत मानकर, माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे, माजी नगरसेवक संतोष मापारी, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, माजी नगरसेवक शेख असलम, शहरउपाध्यक्ष रामचंद्र कोचर, किसान सेल शहर अध्यक्ष मदन परशुवाले, एजाज खान, कृष्णा बाजाड, शेख अफसर शेख तुराब, शेख सज्जाद शेख करामत, रहमान नोरगांबादी, माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष तोसीफ कुरेशी, शुभम चाटे, कलावती ताई राठोड, उत्तम चव्हाण, मोहन राठोड आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments