मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नियमित सर्व कर्मचाऱ्यां समवेत चालू ठेवण्यात याव्या या मागणीसाठी महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी २७ ऑक्टोबर पासून मेहकर पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय सकाळी १० वाजता पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषण करते दिलीप गायकवाड यांनी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता सांगितले. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गफ्फार शहा,महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन मेटांगळे सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments