बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख ते डोणगाव या ७ किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालकासह नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या खड्ड्यामुळे अनेक नागरिकांच्या मणक्यांना गॅप येणे व तसेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदरच्या रस्त्याचे दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असे निवेदन २७ आक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार सिद्धार्थ खरात, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद विभाग यांना देण्यात आले.यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गफ्फार शहा शहिन शहा, गजानन वाळले, नागोराव कष्टे, पत्रकार विष्णु आखरे सह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments