Type Here to Get Search Results !

नांदुरा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आरक्षण सोडत जाहीर


नांदुरा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

 नांदुरा पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता निर्वाचक गणनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. सदर आरक्षण सोडत प्रक्रिया नांदुरा तालुक्याचे तहसिलदार तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अजितराव बाळकृष्ण जंगम यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, नांदुरा येथे १३ आक्टोबर रोजी शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पडली.ह्या सर्व चिठ्ठ्या कु. मृगनयना गजानन पाटील या ५ व्या वर्गातील मुलीच्या हातून काढण्यात आल्या.याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक आणि शासकीय अधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. सन २०२५ मध्ये होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी सोडतीद्वारे निश्चित झालेले अंतिम आरक्षण खालीलप्रमाणे आहे.२१- अलमपुर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),२२- निमगाव - सर्वसाधारण महिला,२३- वसाडी बू.- सर्वसाधारण महिला ,२४- शेलगावं मुकुंद - सर्वसाधारण,२५- जिगावं - अनुसूचित जाती (महिला),२६- चांदुर बिस्वा - सर्वसाधारण,२७- वडनेर भोलजी - नागरिकांचा मागास प्रवर्ग,२८- टाकरखेड - सर्वसाधारण असे आरक्षण राहणार आहे.

Post a Comment

0 Comments