Type Here to Get Search Results !

समाज उपयोगी उपक्रमाने डॉ. गोपाल बछिरे यांचा वाढदिवस सप्ताह होणार साजरा

लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 


दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांचा वाढदिवस सत्कार समारंभ न करता समाज उपयोगी उपक्रमाने सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

अतिवृष्टी व दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे यांचा वाढदिवस कोणताही वैयक्तिक स्वागत सत्काराचा कार्यक्रम न घेता वाढदिवस सप्ताह समाज उपयोगी उपक्रमाने साजरा करणार असल्याचे कळविले आहे. या समाज उपयोगी उपक्रमामध्ये १) दुष्काळग्रस्त ११ हजार माता भगिनींना साड्यांचे वाटप,२) ५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ,३) गोरगरीबांना ब्लॅंकेटचे वाटप ,४) शासकीय रुग्णालयात फळांचे वाटप ,५) शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप असे विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन डॉ. गोपाल बछिरे यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments