Type Here to Get Search Results !

विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते दृढ असावे - शैलेश सावजी

 


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

 ग्रामीण भागातील मुले मुली शिक्षण प्रवाहात आल्या पाहिजेत शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये या दूरदृष्टीकोनातून माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी विठ्ठल रुखमाई शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून डोणगाव, शेलगाव देशमुख ,विश्वी आदी ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू केले असून आज त्या माध्यमातून हजारो मुले, मुली उच्च शिक्षण घेत असून माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी लावलेल्या छोट्याशा वृक्षाचा वटवृक्ष झाला असून या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण देणाऱ्या शिक्षकाचे मोलाचे योगदान असून शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते दृढ असावे या नात्यातून विद्यार्थी सक्षम व संस्कारक्षम बनू शकतो असे प्रतिपादन विठ्ठल रुखमाई शिक्षण प्रसारक संस्था डोणगावचे सचिव तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी केले. आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी शेलगाव देशमुख येथील श्री विठ्ठल रुखमाई विद्यालयांच्या मुख्याध्यापक यांच्या पदग्रहण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण माजी सभापती सायलीताई सावजी ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी व संचालक सतीश सावजी,माजी सरपंच नागोराव टाले, भास्करराव आखाडे, सरपंच पती दिलीप आखरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गफ्फार शाह, उपसरपंच विनोद गोरे, सेवानिवृत्त मुख्याद्यापक काशिनाथ शिंदे विश्वी येथील मुख्याद्यापक आत्माराम मोळवने,माजी सरपंच विठ्ठलराव देशमुख,ज्योतीताई डोळस,कांताबाई मोळवने, अनिताताई लांभाडे, शारदाताई शिंदे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष प्रल्हाद गोरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समाधान सदार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पत्रकार तथा माजी विद्यार्थी विष्णु आखरे, प्रल्हाद गोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शेलगाव देशमुख येथील विठ्ठल रुखमाई विद्यालयाचा मुख्याध्यापक पदाचा पदभार सर्वसामान्यांना घेऊन चालणारे विद्यार्थी व पालकांचा समन्वय साधणारे शिक्षक दिलीप दौलतराव लांभाडे यांना देण्यात आला‌. त्याचबरोबर विश्वी येथील शाळेचे जेष्ठ शिक्षक विनायक रामचंद्र डोळस यांना सुद्धा मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन राम जटाळे यांनी केले.यावेळी गावातील नागरिक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments