Type Here to Get Search Results !

मेहकर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची विशेष मदत मिळवून घेणार -शेतकरी नेते सहदेव लाड,


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

राज्यात यावर्षी जून ते सप्टेंबर या महिन्या दरम्यान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 हजार कोटीच्या वर विशेष मदतीचे पैकेज जाहीर केले आहे. राज्यातील 253 तालुक्यांसाठी हे विशेष पॅकेज सरकारने जाहीर केलेल्या पैकेज मुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार होता मात्र या मदतीच्या पॅकेजमधून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार या सह इतर दोन तालुक्यांना वगळण्यात आले मेहकर लोणार तालुक्यात दोन वेळा ढगफुटी झाल्यामुळे लाखो हेक्टर वरील पिके जमीनदोस्त झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार नाही .सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज मुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता परंतु सदर पॅकेज मध्ये मेहकर लोणार तालुक्यांचा समावेश नसल्यामुळे हा या भागातील शेतकऱ्यावर अन्याय त्यामुळे वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन करण्याची वेळ आली तरी मेहकर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या विशेष बँकेची मदत मिळवून घेणारच अशी रोख ठोख भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष, सहदेव लाड यांनी घेतली आहे.

Post a Comment

0 Comments