चिखली, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
चिखली तालुक्यातील आंचरवाडी गावातील शेतकरी गेल्या अनेक महिन्यापासून वीज पुरवठ्याच्या तीव्र संमस्येला सामोरे जात होते. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांची प्रचंड नुकसान झाले असून त्या शेतीतील पाणी काढण्यासाठी डीपी बसवणे गरजेचे आहे.
गावकऱ्यांनी वारंवार वीज वितरण कंपनीचे वायरमन यांना कळविले परंतु त्यांनी शेतकऱ्यांना विजेचे बिल भरण्याचा अजब सल्ला देऊन टाळाटाळ केली. आंचरवाडी येथील शेतकऱ्यांनी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सुनील मिसाळ व अरुण परिहार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. आणि आपल्या समस्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे हेल्पलाइन शेतकऱ्यांच्या सेंटर बुलढाणा गाठून क्रांतिकारी चे नेते अमोल मोरे यांच्या कानावर कैफियत मांडली अमोल मोरे यांनी संबंधित आंचरवाडी येथील वायरमन आणि सबंधित इंजिनिअर परिस्थितीची जाणीव करून, तत्काळ डीपी बसवा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा दिला.
वीज वितरण कंपनीने तत्काळ डीपी काढून नवीन डीपी नवीन डीपी त्या ठिकाणी बसवण्यात आली. या निर्णयामुळे गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पिकांना योग्य वेळी त्यांचा फायदा होईल. डीपी बसल्यावर ग्रामस्थांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे, आणि सुनील मिसाळ यांचे आभार मानले.या लढ्यामुळे केवळ डीपी बसली नाही, तर शासन आणि विभागांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या समस्येसाठी एकत्रित होणे गरजेचे आहे.यावेळी डीपी बसवतांना अनेक शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
फक्त आंचरवाडी नव्हे, तर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावे वीज समस्येने त्रस्त आहेत. जर तत्काळ उपाययोजना केल्या नाही, तर संघटनेच्या लढा आणखी तीव्र केला जाईल.
अमोल मोरे क्रांतिकारी शेतकरी संघटना बुलढाणा

Post a Comment
0 Comments