मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
जून २०२५ मधील भीषण ढगफुटी आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बसलेले मेहकर आणि लोणार तालुके राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या २५३ अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळल्याने शेतकरी वर्गात प्रचंड संताप उसळला आहे.
या अन्यायकारक निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी १० आक्टोबर रोजी दुपारी १ वाजता उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून मेहकर व लोणार तालुक्यांचा तत्काळ समावेश करण्याची मागणी केली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे,माजी सभापती भास्करराव गारोळे,तालुका प्रमुख निंबाजी पांडव,शहर प्रमुख किशोर गारोळे,माजी जि.प. सदस्य दिलीप वाघ, युवा सेना तालुका अधिकारी ॲड आकाश घोडे, लोणार तालुका समन्वय तेजराव घायाळ, तालुका प्रमुख राजुभाऊ बुधवत,ॲड संदीप गवई, शहर अधिकारी ऋषी जगताप, विलास शिंदे, पंडित बापू देशमुख, सर्कल प्रमुख गजानन राठोड ,अमोल बोरे,नगमा गवळी, आरती देशमुख, संतोष लाड,कडुबा शेजुळ, समाधान ठाकरे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विठ्ठल चव्हाण रफिक गवळी, स्वप्निल हाडे, पवन टाले, दीपक गायकवाड, प्रकाश मानवतकर,जावेद भाई खान छगन सांगोळे, ध्यानेश्वर पातले गणेश गावंडेसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments