नांदुरा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
दसरा सणाच्या दिवशीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा तालुका अध्यक्ष चरणसिंग राजपूत व कार्यकर्त्यांनी चटणी भाकर खाऊन सरकारचा निषेध केला. संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून राज्य शासनाने तात्काळ 50.000 पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी व बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करावा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका हा अतिवृष्टीमुळे बाधित झालेला आहे. या मध्ये जिल्ह्यातील कोणताही तालुका धरसोड करू नये कारण हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून गेलेला आहे. तरी शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा अन्यथा आता गांधीजीच्या मार्गाने आलोय पुढच्या वेळेस भगतसिंगाच्या मार्गाने येऊ दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही मंत्र्याच्या दारी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन आम्ही दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाऊन आमची दिवाळी साजरी करू असा इशारा देखील निवेदनात दिलेला आहे.

Post a Comment
0 Comments