मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित मदन वामन पातुरकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय डोणगाव येथे 1 ऑक्टोबर रोजी प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींसाठी सुरक्षितता व आरोग्य याविषयी मेहकर येथील सुप्रसिद्ध डॉ.प्रगती श्रीकांत राठोड यांनी विद्यार्थिनीचे समुपदेशन केले.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीचे पूजन करण्यात आले . यानंतर डॉ. प्रगती राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात केली. मुलींना शालेय जीवनामध्ये शिक्षणाबरोबर आरोग्यही महत्त्वाचे असून आरोग्य उत्तम राहावे याकरिता काय काय दैनंदिनी असली पाहिजेत. कशा पद्धतीने नियोजनपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन मुलींना विद्यालयांमध्ये डॉ. प्रगती श्रीकांत राठोड यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिलांसाठी अतिशय उत्तम दर्जाचे कार्य करणाऱ्या डॉ. प्रगती राठोड यांनी विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वच्छता व पाळायचे नियम आणि शरीरामध्ये होणारे बदल व येतात घ्यावयाची काळजी याविषयी अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर शालेय जीवनामध्ये सुरक्षितता सुद्धा महत्त्वाची असून नेहमी मुलींनी जागृत राहावे. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य रमेशजी जाधव हे प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित होते. तर पर्यवेक्षक अरुण मुगल , सखु कुटे , पाटील , जाधव, वाठोरे कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

Post a Comment
0 Comments