मेहकर,लोकतंत्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार मेहकर तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रदीपबाप्पु देशमुख यांनी मादणीचे माजी सरपंच भाऊराव जावळे यांची मेहकर तालुका कॉंगेस कमेटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन नियुक्तीपत्र दिले.तसेच मेहकर तालुका कॉंगेस कमेटीच्या सचिवपदी किशोर मरकड,यांची,उकळी जिल्हा परिषद निवडणुक सर्कल प्रमुखपदी पंचायत समितीचे माजी सदस्य अभिमन्यु नवले यांची,तर सोनाटी पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी गजानन आप्पा ईरेगावकर,तर तालुका कॉंगेस कमेटीच्या सरचिटणीसपदी साहेबराव मुधोळकर यांची नियुक्ती करण्यात आली.सदर कार्यक्रम हा जिल्हा परिषद सर्कल उकळी येथे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वसंतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी जिल्हा कॉंगेस किसान सेलचे उपाध्यक्ष विनायकराव टाले, कॉंग्रेसचे नेते राजाराम वाटसरू,कॉंगेस नेते डॉ.शेषराव बंदर, एकनाथ अंभोरे,बबन नवले,डिगांबर वाघ,प्रकाश गायकवाड, संदीप ढोरे,व कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments