Type Here to Get Search Results !

शासनाने केली शेतकऱ्यांची दिशाभूल, हे पाप कुठे फेडसाल - रविकांत तुपकर


मुंबई, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी ९ आक्टोबर व १० आक्टोबर हे दोन शासन निर्ण निर्गमित केले.

९ ऑक्टोंबर च्या शासन निर्णयानुसार (अ ) रकान्यात जिरायती शेती साठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये बागायती शेती साठी १७ हजार रुपये व बहुवार्षीक शेती साठी २२ हजार ५०० रुपये.व रब्बी हंगामात पेरणी साठी तातडीचे १० रुपये ३ हेक्टर पर्यंत देण्याचे व इतर मदत देण्याचे जाहीर केले. (ब )रकान्यात जमीन महसूल वसुलीत सुट, सहकारी कर्जाचे पुर्णगठण,शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती,तिमाही विज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी व १० व १२ विद्यार्थ्यांच्या फि माफी केली आहे. 

मात्र १० ऑक्टोबरच्या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रोख मदत लागू करण्यात आली नसून फक्त सवलती लागू करण्यात आले आहे. त्यामुळे १० ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार मेहकर लोणार तालुका व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त सवलती लागू होतीत .मदत मात्र मिळणार नाही असे आढळून आले आहे.सरकारने शासन निर्णयाचा खेळ करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे .शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे हे सरकार पाप कुठे फेडसणार आहे. असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments