लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
लोणार शहरात असंख्य भटकी कुत्री फिरत असून लहाण मुले नागरिकांना चावा घेत आहेत. सदर भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून हद्दपार करा नसता पालिकेत मोकाट कुत्रे आणून सोडू असा इशारा, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे व शहर प्रमुख गजानन जाधव यांनी 1 आक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता लोणार नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
याप्रसंगी शिवसेना उभाठाचे ॲड.दीपक मापारी,गोपाल मापारी,शाहरउपप्रमुख लूकमान कुरेशी,रवींद्र सुटे,युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत मदनकर, विभाग प्रमुख ,तानाजी अंभोरे, अल्पसंख्यांक सेनेचे अशपाक खान, फहीम खान,वासिम शेख, अमोल सुटे, विजय घोडके, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments