मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील विठ्ठल रुखमाई विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ शिंदे हे दिनांक 30 सप्टेंबर रोजी नियमित वयोमाने सेवा निवृत्त झाले. निवृत्तीबद्दल 1 आक्टोंबर रोजी विठ्ठल रुखमाई विद्यालयाच्या प्रांगणात भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा श्री विठ्ठल रुखमाई शिक्षण प्रसारण मंडळाचे सचिव शैलेश सावजी हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कारमूर्ती काशिनाथ शिंदे ,शारदाताई शिंदे, सरपंच किरणताई आखरे, उपसरपंच विनोद गोरे उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल रुखमाई विद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश सावजी व उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी शारदाताई शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार विष्णू आखरे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रल्हाद गोरे, मल्हार सेनेचे एकनाथ खराट,सामाजिक कार्यकर्ते गजानन म्हस्के,भागवान वाटसर,भीमराव गायकवाड, विठ्ठल रुखमाई विद्यालय विश्वीचे मुख्याध्यापक मिळवणे, चिखली शिक्षण प्रसारण मंडळाचे संचालक गोपाल बोरा, अध्यक्ष शैलेश सावजी आणि सत्कारमूर्ती काशिनाथ शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते हमीद सावकार,गफारशहा, तोफिक भाई, माजी सरपंच विठ्ठलराव देशमुख,विनोद ताकतोडे, सरपंच पती दिलीप आखरे, पोलीस पाटील संतोष सोनुने,तंटामुक्ती समिती अध्यक्ष खंडूजी सदार,बोरा बाबुजी,नारायण खोडवे, दशरथ सदार,माधव डोळस,सिद्धेश देशमुख, विवेक म्हस्के,भिकाजी हरमकर, किशोर पातुरकर,नागनाथ शिंदे,विठ्ठल रुखमाई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समाधान सदार,भावी मुख्याध्यापक विनायक डोळस,राम जटाळे, अरुण चव्हाण, निलेश सुर्वे,अमोल लोकडे,संजय डोंगरे, शैलेश आखाडे, महेश नंदकुळे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दिलीप लांभाडे यांनी केले.

Post a Comment
0 Comments