मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
डोणगाव येथे मदन वामन पातुरकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावरील गणित व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 30 सप्टेंबर करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा मदन वामन पातुरकर विद्यालयाचे पालक संचालक गोपाल बोरा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन सल्लागार राजकुमार सारडा, माजी प्राचार्य त्र्यंबक मोरे, सेवानिवृत्त शिक्षक मुकुंद पिंपरकर, पर्यवेक्षक अरुण मुगल, दत्तात्रय उंडाळ, संजय गव्हले तथा प्राध्यापिका मापारी, शिक्षिका कुटे व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून गणित विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले.
उपस्थित सर्व मान्यवरांनी सर्व विज्ञान व गणितीय उपकरणे यांची पाहणी केली व त्यानंतर वर्ग 5 ते 12 असे वर्गश: सर्व विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने विज्ञान व गणित प्रदर्शनी दाखविण्यात आली.या प्रदर्शनीमध्ये एकूण 64 उपकरणे समाविष्ट होती.यामध्ये विद्यार्थ्यांनी जी उपकरणे बनवून आणली त्यामध्ये जलचक्र ,ऊर्जा तयार करणे, सोलर होम, पवन चक्की, वॉटर फिल्टर, स्मार्ट रोड, हायड्रोलिक ब्रेक, क्लीन वॉटर , होम सेक्युरिटी, पेरिस्कोप व गणिताशी निगडित कोन व कोनाचे प्रकार,वर्ग-वर्गमूळ, घन- घनमूळ, विविध सूत्रांचा वापर अशा अनेक प्रोजेक्टचा विद्यार्थ्यांनी पाहण्याचा आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक , प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू - भगिनी या सर्वांचे सहकार्य लाभले.


Post a Comment
0 Comments