Type Here to Get Search Results !

मेहकर येथे वेगळा विदर्भासाठी नागपूर कराराची होळी

मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 


विदर्भाला महाराष्टात सामील करतांना 28 सष्टेबर 1956 रोजी नागपूर करार करण्यात आला होता.त्या कराराची कोणती ही अंमल बजावणी महाराष्ट सरकारने केली नाही त्यामूळे विदर्भाच्या सर्वच क्षेञातला अनूशेष वाढत गेला.

त्यामूळे वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरत गेली.त्यामूळे नागपूर कराराची होळी करण्याचा इशारा विदर्भ आंदोलन समीतीने दिला त्यानूसार आज दिनांक 28 सप्टेबर रोजी दुपारी 2 वाजता मेहकर येथील जिजाऊ चौकात विदर्भ आंदोलन समीतीचे विदर्भ ऊपाध्यक्ष अॅड सुरेश वानखेडे यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली. यावेळी विदर्भ आंदोलन समीतीचे सोपान देबाजे, कैलास सुखधाने, राधेशाम भराडे, दादासाहेब गवई, प्रा डि एस वाघ, बी बी चौधरी,प्रा विश्वनाथ बाहेकर, प्रल्हादराव रहाटे, अॅड विनोद नरवाडे, संदिप गवई, रमेशराव इंगळे, पंडीतराव देशमूख,आश्रु मानवतकर आदी असंख्य कार्यकर्ते ,पदाधिकारी ऊपस्थित होते.

Post a Comment

0 Comments