मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील श्री विठ्ठल रुखमाई शाळेजवळ असणाऱ्या वीजरोहित्र वर सर्वाधिक वीज भार असल्याने सदर वीज रोहित्रा रावरील वारंवार फ्युज जाणे. तासंतास वीज पुरवठा खंडित होते अशा अनेक समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते.
सदर बाबीची प्रशासनाने दखल घेऊन दिनांक 20/12/2021 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वीज रोहित्रा रावरील वीज कमी करण्याच्या दृष्टीने नवीन 100kv चे ट्रांसफार्मर मंजूर करण्यात आले होते. सदर नवीन सर्वेक्षणाचे स्थळ निरीक्षण कंत्राट दाराकडून करण्यात येऊन सुद्धा अद्यापही वीज रोहित्र बसविण्यात न आल्याने शेलगाव देशमुख येथील युवा सेना तालुका उपप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते एकनाथ आत्माराम खराट यांनी बुलढाणा जिल्ह्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदन दिले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वीजवितरण कंपनी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे फोन करून मंजूर असलेल्या वीज रोहित्रा चे काम तात्काळ करण्यात यावे अशा सूचना दिल्या.


Post a Comment
0 Comments