लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
लोणार तालुक्यातील सकल आदिवासी समाजाची आरक्षण बचाव बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ६ ऑक्टोबरला होणाऱ्या मोर्चाचे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. टापरे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मोठ्या प्रमाणात आरक्षणासाठी वेगवेगळ्या समाज रस्त्यावर येत आहे त्याचाच आदिवासी समाजामध्ये धनगर, बंजारा व इतर काही जाती घुसखोरीच्या करण्याच्या प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे समाज बांधवांनी गाफील राहू नये. मूळ आदिवासी ७५ वर्षापासून मागासलेला आहे त्यांच्या पर्यत्न शासनाच्या कोणत्याच योजना पोहोचल्या नाहीत त्यामुळे बंजारा, धनगर यांचा कट आणून पाळण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आव्हान केले.
तर बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष भगवानराव कोकाटे म्हणाले अभी नही तो कभी नही म्हणत सर्व संघटनांना एकत्रित येऊन लढा देणे गरजेचे आहे हैदराबादचा गॅजेटियरचा आधार घेऊन आरक्षण देणे हे असविधानिक आहे. ते शासनाने चूक करू नये अन्यथा महाराष्ट्र जाम करू देशाच्या कारभार हा संविधानानुसार चालतो हे विसरू नका
या बैठकीला अध्यक्ष म्हणून गजानन सोळंके साहेब तर प्रमुख उपस्थिती विनोद ठाबेराव बुलढाणा पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केल. सामाजिक कार्यकर्ता माजी कृषी अधिकारी माघाडे , केशव फुपाटे, ठोंबरे, जटाळे, विठ्ठल कोकाटे, सकाराम लाखाडे, दत्ता फुपाटे, मार्कड, रामदास कोकाटे, हनुमान डाखोरे, नवनाथ रिठाड, विजू माघाडे, बंडू डाखोरे, निवृत्ती धोत्रे, भिकाजी डाखोरे, बबन तनपुरे, संतोष डवरे, बबन कोकाटे, एकनाथ घाटे, पंढरी कोकाटे नारायण जाधव, विलास मोरे, इत्यादीनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पारधी यांनी केले.

Post a Comment
0 Comments