बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टीने व ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड अडचणी आला त्यावेळी ओला दुष्काळ जाहीर करुन एकरी ५० हजार रुपये मदत द्या आणि घोषीत केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अमोल मोरे, दत्तात्रय जेऊघाले यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments